नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. उत्तर गुजरातच्या वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 ला त्यांचा जन्म झाला. मोदींनी राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच ते संघामध्ये जायचे त्यामुळे त्यांच्यावर संघाचा जास्त प्रभाव दिसून येतो. गुजरातमध्ये आसएसएसनेही चांगलेच पाय रोवलेले होते. दरम्यान नरेंद्र मोदी हे 1967 मध्ये संघाशी जोडले गेले. यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. यावर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेतले. त्यानंतर 1974 मध्ये ते नव निर्माण आंदोलनात सहभागी झाले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. 2001 पासून मोदींकडे गुजरातचा कारभार देण्यात आला. त्यानंतर सलग 13 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. यानंतर ते केंद्रात त्यांच्या नेतृत्त्वात सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे काही दुर्मिळ फोटो….