पुणे -सोन्याचे भाव सध्या उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर आगामी काळात ते वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, देशातील विविध राज्यात विविध शहरांत सोन्याच्या भावात एकरूपता नसते. त्यामुळे हे भाव एकसारखे करण्याबाबत म्हणजे दरांचे स्टॅंडर्डडायजेशन करण्याबाबत शासन विचार करीत आहे.
भारतामध्ये लोकाकडे बराच जुना सोन्याचा साठा आहे. मात्र, त्याचा दर्जा वेगवेगळ्या स्वरूपात आहे. काही जणांकडे 22 कॅरेट, तर काहींकडे 18 कॅरेट सोने असते. त्यामुळे सोन्याच्या दरात एकरुपता आणण्यात अडथळे निर्माण होतात. यावर प्रदीर्घकाळ चर्चा झाल्यानंतरच सोन्याच्या दरात एकरुपता आणण्याच्या शक्यतेवर विचार केला जाऊन शकतो. सोन्यावर सीमाशुल्क आणि जीएसटी सारखे असले तरी विविध राज्यातील इतर कर, वाहतूक, विमा या कारणामुुळे सोन्याच्या दरात फरक पडतो.