सोमेश्वरनगर – निंबूत छपरी येथे प्रधान मंत्री उज्वला योजनेतून 51 लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले. कुमार गॅस वितरक व प्रमोदकाका काकड फाउंडेशन निंबूत यांच्या माध्यमातून या लाभार्थी महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, गौतम काकडे, अमित तापडिया, निंबूतचे सरपंच राजू बनसोडे, वाघळवाडीचे राजू काशवेद व वाणेवाडीचे कल्याण जगताप, डॉ. सौरभ काकडे, अतुल लकडे, नंदकुमार काकड आदी मान्यवर उपस्थित होते.