पाटण – कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग गुरूवारी सकाळ पासून कमी केल्याने पाटण शहारातील पुरस्थिती नियंत्रणात आली आहे.कराड-चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नविन स्टॅंड ते झेंडा चौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.
कोयना धरणाचे दरवाजे आठ फूटांवर स्थिर ठेवण्यात आले असून 68 हजार 412 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने पाटण शहरासह तालुक्यात हाहाकार उडवून दिला होता. गेल्या पाच दिवसापासून पाटण शहारातील कळकेचाळ, झेंडाचौक, नविन एस. टी. स्टॅंड, जुना एस. टी. स्टॅंड, नगरपंचायत इमारतीचा परिसर तसेच पंचायत समितीच्या पाठीमागील परिसर पाण्यात गेल्याने ओढवलेल्या पूरपरिस्थितीचा फटका पाटण शहारातील पुरग्रस्तांना बसला आहे.
यामुळे पुरबाधीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवून त्यांना अन्न वनिवारादेण्याचेमहत्वपूर्ण काम प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील सामाजीक संघटनेतील युवकांनी केले. उपविभागीाय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी बारकाईने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत सामाजीक संघटनांच्या मदतीने पूरपरिस्थितीचा सामना केला. यामध्ये त्यांना पाटणमधील सामाजीक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
सकाळ पासून कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. काल सायंकाळी 16 फूटांवर असलेले धरणाचे दरवाजे गुरूवारी सकाळी पाच वाजता 8 फूटांवर स्थिर करण्यात आले त्यामुळे धरणातून 68 हजार 412 क्युसेकपाणीकोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात 77 हजार 158 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.