टोकियो – जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांना पराभव स्वीकारावा लागला. रान्किरेड्डी व शेट्टी यांना जपानच्या ताकेशी कुमारा व केईगो सोनोदा यांनी 21-19, 21-18 असे हरवित आगेकूच राखली.
दरम्यान, दुसरीकडे जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे पी.व्ही.सिंधू हिचे स्वप्न संपुष्टात आले असले तरी भारताच्या बी.साईप्रणीतने मात्र सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडवित उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. साईप्रणीतने इंडोनेशियन खेळाडू टॉमी सुगियार्तो याच्यावर 21-12, 21-15 असा विजय मिळविला.