आता येडियुरप्पांची सोमवारी परीक्षा

बंगळूर: कर्नाटकमधील सत्ताबदलानंतर आता नवे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी ते सोमवारी (29 जुलै) विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहेत. याआधी विधानसभेत झालेल्या शक्तिपरीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळले. त्यावेळी सरकारच्या बाजूने 99 आमदारांनी मतदान केले. तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे झालेल्या सत्ताबदलानंतर येडियुरप्पा यांच्या शक्तिपरीक्षेबाबतची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. येडियुरप्पा यांची भिस्त आघाडीच्या 16 बंडखोर आमदारांवर आहे. शक्तिपरीक्षेवेळी ते अनुपस्थित राहिल्यास सहज जिंकण्याचा विश्‍वास येडियुरप्पा यांना वाटत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.