सातारा – सातारा शहर शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख निमिष शहा यांनी दिली.
सकाळी पावणेदहा वाजता भिक्षेकरी गृह येथे मिष्टान्न वाटप, आशा किरण शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप व नर्सरीच्या मुलांना तीन चाकी सायकल व खेळणी वाटप, पावणेअकरा वाजता महागाव येथील वृध्दाश्रमात फळे व बिस्किट वाटप, पावणेबारा वाजता शाहू बोर्डिंग सातारा शाखा नं 2 येथे फळे व बिस्किट वाटप केले जाणार आहे.
या कार्यक्रमास कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, संपर्क प्रमुख एकनाथराव ओंबळे, जिल्हाप्रमुख यशवंतराव घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख अतिश ननावरे, अनिल गुजर, अण्णा देशपांडे, कर्नल सुशील साबळे, शिवाजी पवार, ऍड शिरीषकुमार दिवाकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.