कोल्हापूर – विदर्भ-मराठवाड्यात कृत्रिम पावसाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या महिन्याभरात अंदाज घेऊन हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते आज कोल्हापुरात बोलतं होते. कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरु झालीय. यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केला असता, राज्यात नवीन काही घडत असेल तर माझ्या नावाची चर्चा होतच असते, असं म्हणत कोणतेही स्पष्ट वक्तव्य करणं दादांनी टाळलं आहे.