लंडन – मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 15 धावांनी पराभव करत स्पर्धेतील लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यानंतर आज ऑस्ट्रेलियाची लढत भारतीय संघाशी होणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याने आमच्या संघावर कोणतेही दडपण नसून आम्ही चांगली कामगिरी करून विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
या लढतीआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच यांनी प्रतिक्रिया दिली. भारताबरोबर यापूर्वी आम्ही जास्तीत सामने जिंकले असल्यामुळे आमच्यावर कोणतेही दडपण नाही. विश्वचषक राखण्यासाठीच आम्ही उतरलो आहोत. आमच्या खेळाडूंनी येथे आतापर्यंत सातत्य दाखविले आहे. आजही त्याचीच अनुभूती दिसेल अशी मला खात्री आहे असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच याने सांगितले.