प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा
पुणे – स्वप्नील सावगवेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आयरिसर्च संघावर 56 धावांनी मात केली. इतर लढतींत टीसीएस, झेन्सर, एफआयएस ग्लोबल संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
मास्टर क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या लढतीत आयरिसर्च संघाने अचूक मारा करून टेक महिंद्रा संघाला 19.4 षटकांत 129 धावांत रोखण्यात यश मिळवले होते. टेक महिंद्राकडून स्वप्नील सावगवेने 39 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारसह सर्वाधिक 51 धावा केल्या. यानंतर स्वप्नीलने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही चमक दाखवली.
स्वप्नीलच्या हॅटट्रिकच्या जोरावर आयरिसर्च संघाचा डाव 14.4 षटकांत 73 धावांत आटोपला. स्वप्नीलने चौथ्या षटकात सलग चार चेंडूंवर अक्षय खोडे, शक्तीसिंग, सचिन शर्मा, उद्धव दावरे यांना बाद केले. या चौघांना खातेही उघडता आले नाही. स्वप्नीलने 4 षटकांत 2 षटके निर्धाव टाकून 5 धावांत सहा गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
1) टेक महिंद्रा – 19.4 षटकांत सर्वबाद 129 (स्वप्नील सावगवे 51, सचिन पिंपरीकर ्33, अक्षय खोडे 2-20, अशोक अय्यर 2-26, प्रशांत चव्हाण 2-22) वि. वि. आयरिसर्च – 14.4 षटकांत सर्वबाद 73 (धीरज कासिआला 27, स्वप्नील सावगवे 6-5, विकास भाकरे 2-19, अजय 1-14).
2) एलटीआय – 20 षटकांत 6 बाद 138 (सिद्धार्थ ठाकूर 41, प्रतीकसिंग 30, अरमान पटनाईक 19, सिद्धार्थ जलान 1-24) पराभूत वि. झेन्सर – 18.4 षटकांत 4 बाद 141 (भरत झव्हेरी 67, अकिब पीरझादे नाबाद 30, प्रतीकसिंग 1-15).
3) बार्कलेज – 20 षटकांत 9 बाद 144 (दत्तात्रय रौती 39, सचिन बदरायणी 34, प्रवीण सोनी 3-17, प्रशांत पोळ 2-21, रोहित भटालिया 2-30) पराभूत वि. एफआयएस ग्लोबल – 18.4 षटकांत 4 बाद 145 (प्रशांत पोळ 42, दिव्यांशू कुमार नाबाद 37, गीत देसाई 33, दत्तात्रय रौती 1-17).
4) सिनेक्रॉन – 18.5 षटकांत सर्व बाद 131 (विवेक राठोड 36, अरुण 20, संजयसिंग 17, जमीर शेख 17, गौरव सिंग 5-17, अभिनव कालिया 3-32) पराभूत वि. टीसीएस – 16.4 षटकांत 2 बाद 132 (विक्रमजितसिंग नाबाद 45, निकुंज अगरवाल 37, मयंक जसोरे 32, कार्तिक हिरपारा 1-6, सौरभसिंग 1-29).