बिकानेर – गतवर्षीचा विजेता अभिषेक मिश्रा याने डेझर्ट स्टॉर्मच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एसएस4 गटात आघाडी घेतली. द टीम स्पार्किचा गॅरेज स्टार याने सह चालक श्रीकांत गोवडासह चमक दाखवली. एक्स्ट्रीम गटात आघाडी घेतलेल्या सिधूला चमक दाखवता न आल्याने सकाळच्या सत्रात 03:22:46 अशी वेळ नोंदवली. टीम महिंद्रा ऍडव्हेंचरच्या सिधूने ( अश्विन नाईकसह) पहिल्या दिवशी चमक दाखवली. पण, एसएस4 गटात उन्हामुळे ते मागे पडले.
त्याचा संघ सहकारी गौरव गिल (मुसा शेरीफसह) हे पहिल्या दिवशी चौथ्या स्थानी होते. दुस-या दिवसाच्या सकाळच्या सत्रात त्यांनी कामगिरी उंचावत दुसरे स्थान मिळवले. त्याने 01:10:11 अशी एसएस4 गटात वेळ नोंदवली.त्यामुळे त्यांची एकूण वेळ 03:25:46 अशी झाली. ते आघाडीवर असणा-या संघापासून केवळ तीन मिनिटे मागे आहेत.सम्राट यादव ( सह चालक कुणाल कश्यप) हा तिस-या स्थानी आहे.
टीवीएस रेसिंगच्या फ्रांसच्या ऍड्रीअन मेटगेने मोटो गटात आघाडी घेतली. त्याने एसएस 1 आणि एसएस 2 गटात एकूण 02:03:34 अशी वेळ नोंदवली. तर, गुरुवारी एसएस 4 गटातही त्याने अशीच कामगिरी केली. भारताचा स्टार बायकर असलेल्या हिरो मोटरस्पोर्टसच्या सी.एस.संतोष (02:11:20) व टीवीएस रेसिंगचा अब्दुल वाहीद तनवीर हे ऍड्रीअनच्या मागे आहेत.
एनड्युअर गटात अंकुर चौहान ( सह चालक प्रकाश एम.) याने आठ विभागानंतर 13 मिनिटे 38 सेकंदासह आघाडी घेतली.त्यानंतर दिपक सचदेवा ( सह चालक जपज्योत सिंग धिंगरा) आणि कॅप्टन अभिलाष सिंग (सह चालक आशिष अग्रवाल) हे आहेत. मोटो गटात 8 तर, एक्स्ट्रीम गटात 4 स्पर्धकांना पहिल्या दिवशी स्तर पुर्ण करता आला नाही. जेतेपदाचा दावेदार असलेल्या संजय अग्रवाल (सह चालक स्मिथा एन.) यांची मारुती विटाराने सुरुवात झाल्यानंतर गरमी आणि तांत्रिक कारणामुळे लगेचच पेट घेतला.
मोटोसाठी असलेल्या 41 किमी एसएस1 आणि एक्स्ट्रीम गटाची सुरुवात बिकानेर जिल्ह्यातील नूरसर गावातून झाली . तर, एसएस 2 या 46 किमी स्पर्धेची सुरुवात राजासर गावातून झाली. एक्स्ट्रीम ड्रायव्हर्सनी रात्रीच्या सत्रात देखील सहभाग नोंदवला. 41 किमी असलेल्या या सत्राची सुरुवात केलन गावातून झाली.