आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज स्पर्धा
पुणे – श्रावी देवरे, अंशुल पुजारी, रित्सा कोंडकर, नमिश हूड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत येथे पार पडलेल्या पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावी देवरेने स्वरा जावळेचा 7-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात अव्वल मानांकीत अंशुल पुजारीने दुस-या मानांकीत क्रिशय तावडेचा 7-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
10वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित नमिश हूड याने पाचव्या मानांकित राम मगदूमचा 7-4 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित रित्सा कोंडकर हिने श्रेया पाठारेचा टायब्रेकमध्ये 7-6(4) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
सविस्तर निकाल :
8 वर्षाखालील मुली : अंतिम फेरी : श्रावी देवरे वि.वि. स्वरा जावळे 7-3.
8 वर्षाखालील मुले : अंतिम फेरी : अंशुल पुजारी (1) वि.वि. क्रिशय तावडे (2) 7-2.
10 वर्षाखालील मुले : अंतिम फेरी : नमिश हूड (4) वि.वि. राम मगदूम (5) 7-4.
10वर्षाखालील मुली : अंतिम फेरी : रित्सा कोंडकर (2) वि.वि. श्रेया पाठारे 7-6 (4).