मानागुआ, (निकारागुआ) – भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारे निकारागुआ हा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश ठरला आहे. भारत आणि निकारागुआने औषधांच्या नियमन क्षेत्रात सहकार्यावरबाबत फार्माकोपियावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
निकारागुआमधील भारताचे राजदूत सुमित सेठ आणि निकारागुआच्या आरोग्य मंत्री मार्था रेयेस यांनी दोन्ही देशांमधील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
ज्या देशांचे एकतर स्वतःचे फार्माकोपिया आहे किंवा त्या देशात उत्पादित किंवा वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या मानकांचा संदर्भ देण्यासाठी दुसऱ्या देशाचा फार्माकोपियाला मान्यता दिली जाते, असे निकारागुआ येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.