NZ vs AUS 1st Test (wellington) :– ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत न्यूझीलंडने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात तीन बाद १११ धावसंख्येवरुन आपला डाव सुरु केला. लंच ब्रेकच्या काही मिनिटांत नॅथन लायनच्या (6-64) शानदार फिरकी गोलंदाजीसमोर न्यूझीलंड १९६ धावांवर सर्वबाद झाला. नाथन लियॉनने संपूर्ण सामन्यात १०८ धावांत दहा विकेट्स घेत विजयात मोलाचा सहभाग नोंदवला. एकाच कसोटीत दहा विकेट्स घेण्याची ही त्याची पाचवी वेळ ठरली.
Australia take a 1-0 lead in the Tegel Test Series 🏏 Head to https://t.co/3YsfR1YBHU or the NZC App for the full scorecard 📲 #NZvAUS pic.twitter.com/P5ob41tcI2
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 3, 2024
पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७३ धावा केल्या होत्या. कॅमेरून ग्रीनने १७४ धावांची खेळी केली. तर मिचेल मार्शने ४० धावा केल्या. किवीजकडून मॅट हेन्रीने पाच बळी घेतले.
याला प्रत्त्युत्तर देताना न्यूझीलंडचा पहिला डाव १७९ धावांवर आटोपला होता. त्यामध्ये ग्लेन फिलिप्सने ७१ आणि मॅट हेनरीने ४२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने चार विकेट घेतल्या. कांगारूंकडे पहिल्या डावात२०४ धावांची आघाडी होती.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १६४ धावा केल्या. त्यामध्ये नॅथन लायनने ४१, ग्रीनने ३४ आणि ट्रॅव्हिस हेडने २९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून फिलिप्सने पाच विकेट घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ३६८ धावांची झाली आणि किवींना ३६९ धावांचे लक्ष्य मिळाले.
Nathan Lyon : नॅथन लायनने रचला इतिहास, आर. अश्विनचा मोठा विक्रम काढला मोडीत…
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९६ धावांवर गारद झाला. रचिन रवींद्रने ५९ तर डॅरिल मिशेलने ३८ धावा केल्या. या डावात नॅथन लायनने सहा विकेट घेतल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने १७२ धावांनी विजय मिळवला. ग्रीनला त्याच्या शतकासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.