Kailash Vijayvargiya : मध्यप्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. कारण मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशावरून धक्कादायक विधान केले आहे. विजयवर्गीय यांनी कमलनाथ यांना ‘सडलेले फळ’म्हणत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
राज्यात मागील काही दिवसापासून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत.
मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी कमलनाथ यांना सडलेले आणि शिळे फळ म्हटले आहे. विजयवर्गीय यांनी कमलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवरही वक्तव्य केले आहे. कैलाश म्हणाले की, भाजपमध्ये कमलनाथ यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत.
विजयवर्गीय म्हणाले की, “जर कोणी बाजारात गेले तर ते ताजी फळे खरेदी करतील. काही शिळी फळे खरेदी करतील. आम्ही त्यांना (कमलनाथ) भाजपमध्ये अजिबात घेणार नाही. त्यांना यायचे असले तरी त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत.”
दरम्यान, कमलनाथ यांनी मात्र या चर्चांना अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र राजकीय नेते स्वतंत्र असून त्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचेही सांगण्यात आले. कोणीही कोणत्याही पक्षात सामील होण्यास स्वतंत्र आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का, असे विचारले असता? यावर कमलनाथ म्हणाले, उमेदवारांबाबत सर्व निर्णय पक्ष घेईल. उमेदवार त्यांच्या विजयी क्षमतेच्या आधारे ठरवले जातील.असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.
कमलनाथ यांनी छिंदवाडामधून 9 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. ते गेल्या दोन वेळा छिंदवाडा येथून आमदार आहेत. त्यांचा मुलगा नकुलनाथ सध्या छिंदवाडा येथून खासदार आहे. कमलनाथ डिसेंबर 2018 ते मार्च 2020 दरम्यान मुख्यमंत्री होते. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.