काठमांडू – आयपीएल खेळलेला नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछा हा बलात्कार प्रकरणात दोषी आढळला आहे. संदीपवर 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
काठमांडू जिल्हा न्यायालयाने संदीपला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. नेपाळच्या माजी कर्णधारावर ऑगस्ट 2022 मध्ये काठमांडूमधील एका हॉटेलमध्ये 18 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता, जो आता सिद्ध झाला आहे.
संदीपला किती काळ तुरुंगवास भोगावा लागणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी 10 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय होणार आहे.
न्यायाधीश शिशिर राज ढकल यांच्या खंडपीठाने आठवडाभर चाललेल्या सुनावणीचा समारोप केला आणि ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या बलात्काराच्या वेळी मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट केले. बलात्काराच्या वेळी मुलगी अल्पवयीन होती, असे आरोप करताना म्हटले होते.