India vs South Africa 1st Test Day 2 Lunch : – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ 59 षटके खेळता आली. आज दुसऱ्या दिवशी भारताने आठ बाद 208 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला आणखी 37 धावांची भर घालता आली. भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.4 षटकांत 245 धावांवर आटोपला.
दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात एक विकेट गमावून 49 धावा केल्या आहेत. डीन एल्गर 29 धावांवर नाबाद असून टोनी डी जॉर्जी 12 धावांवर नाबाद आहे. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. यानुसार आफ्रिकन संघ अजूनही भारताच्या 196 धावांनी मागे आहे.
LUNCH: The first session on Day 2 comes to an end with South Africa at 49-1 after 16 overs.
Mohd. Siraj picks up the first wicket of Aiden Markram.
Scorecard – https://t.co/Zyd5kIcqCQ #SAvIND pic.twitter.com/kKPeLEfXBP
— BCCI (@BCCI) December 27, 2023
दक्षिण आफ्रिकेला 11 धावांवर पहिला धक्का बसला. सिराजने एडन मार्करामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत पाच धावा करता आल्या. 11 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर डीन एल्गर आणि टोनी डी जॉर्जीने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी एकही विकेट पडू न देता 30+ धावांची भागीदारी केली आहे.
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.4 षटकांत 245 धावांवर आटोपला. आज भारताने आठ बाद 208 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला आणखी 37 धावांची भर घालता आली. आजचा पहिला धक्का मोहम्मद सिराजच्या (22 चेंडूत 5 धावा) च्या रूपाने बसला. गेराल्ड कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्यानंतर नांद्रे बर्जरने राहुलला क्लीन बोल्ड करत भारताचा डाव संपवला.
#SAvsIND 1st Test Day 2 : राहुलचं शानदार शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला…
आज टीम इंडिया मैदानात आली तेव्हा राहुल 70 धावा करून खेळत होता. यानंतर त्याने कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. 137 चेंडूंत 14 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 101 धावा करून तो बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने 20 षटकांत 59 धावांत 5 खेळाडू बाद केले. पहिली कसोटी खेळताना नांद्रे बर्जरने 3 बळी घेतले. मार्को युनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना 1-1 यश मिळाले.