Latha Rajinikanth – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत (Latha Rajinikanth) यांना न्यायालयाने आज एका प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या कोचादईयान’ नावाच्या चित्रपटाशी संबंधित वादातून निर्माण झालेल्या प्रकरणात लता रजनीकांत या आरोपी आहेत.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या बेंगळुरू येथील कोर्टात काल हजर झाल्या. त्यांनी या प्रकरणात दोषमुक्तीसाठी अर्जही दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
तत्पुर्वी न्यायालयाने त्यांची १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि २५ हजार रुपयांच्या रोख जामिनावर मुक्तता केली. लता यांच्या विरोधात खासगी जाहीरात संस्थेने तक्रार दाखल केली होती. कोचादईयानची दिग्दर्शिका लता रजनीकांत यांची मुलगी होती.