India vs South Africa 1st Test Day 2 IND first innings : – नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 67.4 षटकांत 245 धावांवर आटोपला. आज भारताने आठ बाद 208 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला आणखी 37 धावांची भर घालता आली. आजचा पहिला धक्का मोहम्मद सिराजच्या (22 चेंडूत 5 धावा) च्या रूपाने बसला. गेराल्ड कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्यानंतर नांद्रे बर्जरने राहुलला क्लीन बोल्ड करत भारताचा डाव संपवला.
India put on a competitive total on board, courtesy of another KL Rahul special in Centurion 👏
📝 #SAvIND: https://t.co/REqMWoHhqd | #WTC25 pic.twitter.com/yJg743v9EW
— ICC (@ICC) December 27, 2023
आज टीम इंडिया मैदानात आली तेव्हा राहुल 70 धावा करून खेळत होता. यानंतर त्याने कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. 137 चेंडूंत 14 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 101 धावा करून तो बाद झाला.
दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने 20 षटकांत 59 धावांत 5 खेळाडू बाद केले. पहिली कसोटी खेळताना नांद्रे बर्जरने 3 बळी घेतले. मार्को युनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना 1-1 यश मिळाले.
पहिल्या दिवशी काय झाले?
तत्पूर्वी, पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल 17 धावा करून तर शुभमन गिल दोन धावा करून माघारी परतला. 24 धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.
विराट 38 धावा करून बाद झाला तर श्रेयस 31 धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने 24 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, पण केएल राहुलने खालच्या फळीतील फलंदाजांसह डाव संभाळत शतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत (245 धावा) नेले.