India vs South Africa 1st Test Highlights : सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावला. गुरुवारी (28 डिसेंबर) सामन्याच्या तिसर्या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात 131 धावांवर ऑलआऊट झाली. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात 163 धावांची आघाडी होती. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
That’s that from the Test at Centurion.
South Africa win by an innings and 32 runs, lead the series 1-0.
Scorecard – https://t.co/032B8Fmvt4 #SAvIND pic.twitter.com/Sd7hJSxqGK
— BCCI (@BCCI) December 28, 2023
दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्नही भंगले. आता दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.
भारताचा दुसरा डाव….
दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या रूपाने भारताला 10वा धक्का बसला आणि यासोबतच टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मार्को यानसेनच्या चेंडूवर विराटनं अप्रतिम फटका मारला, पण धावत-धावत कागिसो रबाडाने उत्कृष्ट झेल घेतला. 82 चेंडूत 76 धावा करून कोहली बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार मारला.
कोहलीने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक 76 धावा केल्या. शुभमन गिलने 26 धावा केल्या. या दोघांशिवाय टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रेयस अय्यर सहा, यशस्वी जैस्वाल पाच, केएल राहुल चार, मोहम्मद सिराज चार आणि शार्दुल ठाकूर दोन धावा करून बाद झाला. रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. प्रसीध कृष्ण खाते न उघडता नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात नांद्रे बर्गरने सर्वाधिक चार, मार्को जॅनसेनने तीन आणि कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले.