मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून मनसेच्या (MNS toll protest) कार्यकर्त्यांनी मुलुंड टोलनाका (Mulund toll naka) पेटवून दिला. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असे राज ठाकरे म्हणाले होते.
मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर रस्त्यावर उतरुन टोलनाक्यांची पाहणी केली. अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केले.
लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, दुपारी अविनाश जाधव यांनी आंदोलन केल्यानंतर, संध्याकाळी मुलुंड टोलनाका पेटवून देण्यात आला.