Ujjwala Yojana – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उज्जवला योजनेतील (Ujjwala Yojana) लाभार्थींना आता 200 ऐवजी 300 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आता एलपीजी गॅस सिलेंडर (Cylinder) 600 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी, रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने केंद्र सरकारने 200 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.
रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना आता 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले.
दिल्लीतील उज्ज्वला लाभार्थींना सध्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरसाठी 703 रुपये देतात, तर त्याची बाजारात सामान्य नागरिकांसाठी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 903 रुपये मोजावे लागतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यांना 603 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.