मंचर, दि. 29 (प्रतिनिधी) -मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत भीमाशंकर सहकारी पॅनलने बाजी मारली असून, त्यांचे एकूण 17 उमेदवार विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादीचे बंडखोरी करून स्वतंत्र पॅनल उभे करणारे देवदत्त निकम हे विजयी झाले आहेत. शिवसेना-भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे भीमाशंकर शेतकरी विकास पॅनल व देवदत्त निकम हे स्वत: सोडून त्यांच्या पॅनलचा सर्व जागांवर पराभव झाला.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमाशंकर सहकारी पॅनलचे 14 उमेदवार निवडून आल्याने वळसे पाटील यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण तीन पॅनलमध्ये लढत झाली होती. दरम्यान, देवदत्त निकम यांचा विजय राष्ट्रवादी कॉंग्रेसाठी चिंता वाढवणारा आहे.
विजयी उमेदवार
सोसायटी (सर्वसाधारण गट) : संदीप दत्तात्रय थोरात, गणेश सूर्यकांत वायाळ, शिवाजीराव बाबुराव ढोबळे, वसंतराव भागूजी भालेराव, सचिन हरिभाऊ पानसरे, रामचंद्र देवराम गावडे. देवदत्त जयवंतराव निकम (एकमेव बंडखोर). महिला : रत्ना विकास गाडे, मयुरी नामदेव भोर. कृषी पतसंस्था बहुउद्देशीय सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग) : जयसिंग कुंडलिक थोरात.
अनुसूचित जमाती : सखाराम धोंडू गभाले. ग्रामपंचायत (सर्वसाधारण) : सोमनाथ वसंतराव काळे, निलेश विलास थोरात. ग्रामपंचायत (अनुसूचित जाती जमाती) : संदीप भीमाजी चपटे. आर्थिक दुर्बल : अरुण शांताराम बांगर (बिनविरोध).व्यापारी आडते : लक्ष्मण बानखेले, राजेंद्र भंडारी (दोघे बिनविरोध). हमाल व तोलारी : सुनील खानदेशे (बिनविरोध)