पृथ्वीच्या खाली असलेले जग ज्याला सामान्यतः ‘पाताळ’ म्हणतात. याबाबतच्या अनेक कथा, किस्से तुम्ही ऐकले असतील. पण तुम्ही पाताळ लोक खरोखर पाहिले आहे का? थोडं विचित्र वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र अधोलोक आहे. हे अनोखे जग पृथ्वीच्या अनेक फूट खाली वसलेले आहे. इथे घरं आहेत, माणसं आहेत आणि शहरही आहे. मनोरंजनासाठी आवश्यक ती सर्व साधने आहेत आणि राहण्यासाठी अन्न, पाणी आणि हवा आहे. जगाच्या कोणत्या कोपऱ्यात हे ‘पाताळलोक’आहे ? येथे लोक कसे राहतात आणि येथे काय विशेष आहे? चला तर, जाणून घेऊया.
हे संपूर्ण शहर जमिनीच्या काही फूट खाली वसलेले आहे. येथे अनेक घरे आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, राहण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक साधनसामग्री उपलब्ध आहे. हे ठिकाण ऑस्ट्रेलियात आहे. या ठिकाणाचे नाव ‘कूबर पेडी’ आहे. कूबर पेडीला पृथ्वीचे अंडरवर्ल्ड म्हणूनही ओळखले जाते.
वास्तविक, येथील बहुतांश घरे जमिनीच्या आत बांधलेली आहेत. जमिनीवर फार कमी लोक राहतात. जमिनीखाली लोक राहण्यामागील कारणही रंजक आहे. येथे अनेक ओपल नावाच्या किमती दगडाच्या खाणी असल्याने लोक जमिनीखाली राहतात. उत्खननादरम्यान त्यांना अनेक महिने जमिनीखाली काढावे लागले, अशा परिस्थितीत त्यांनी आपले घर आणि मनोरंजनाची प्रत्येक साधने येथे गोळा करण्यास सुरुवात केली.
हे अनोखे अधोलोक साधारण नाही. इथे फक्त लोकच राहतात असे नाही तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या सहसा तुम्ही जमिनीवरही पाहू शकत नाही. एक, येथील दृश्य काहीसे वेगळे आहे. दुसरे म्हणजे, घरांमध्ये लक्झरी सुविधांव्यतिरिक्त चर्च, मॉल्स, रेस्टॉरंट्स तसेच एकापेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. एवढेच नव्हे तर हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शुटिंगदेखील या ठिकाणी झाले आहे.
येथे एक-दोन नाही तर तब्बल 1500 घरे आहेत यावरून तुम्हाला अधोलोकाची कल्पना येऊ शकते. विशेष म्हणजे राहण्यासोबतच हे ठिकाण पर्यटनाचेही मोठे केंद्र बनले आहे.