मुंबई – नुकतंच (बुधवार) एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. राज ठाकरेंची ही मुलाखत अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे या दोघांनी घेतली. सध्या सगळीकडे या मुलाखतीची चर्चा होताना दिसत आहे. या मुलाखतीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सर्वच जण यावर आपली प्रतिक्रिया देत आहे.
दरम्यान, यावेळी अमोल कोल्हे यांची भेट राज ठाकरे यांचा मुलगा ‘अमित ठाकरे’ यांच्यासोबत झाली. याच भेटीबद्दल अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य तर चर्चेत आहेच शिवाय या भेटीचा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वतः अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
अमित ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत अमोल कोल्हेंनी पोस्ट लिहिली आहे. “जमिनीवर पाय असलेल्या अमित ठाकरेंना भेटून आनंद झाला..’ असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. अमोल कोल्हेंची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्यावर अनेकांनी कमेंटही आल्या आहेत. दारम्यान, राज ठाकरेंनी या कार्यक्रमात कुटुंबियांसह हजेरी लावली होती. राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे यांच्यासह उपस्थित होते.