नवी दिल्ली – बीआरएस पक्षाच्या नेत्या के कविता मंगळवारी तिसऱ्यांदा दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या या 44 वर्षीय कन्या, सकाळी 11:30 वाजता ईडी कार्यालयात पोहचल्या. ईडी समोर कविता यांची ही तिसरी साक्ष आहे. 11 मार्च आणि 20 मार्च रोजी त्यांची ईडीने सुमारे 18 ते 20 तास चौकशी केली आहे.
कविता यांच्यावर हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई, यांच्याशी संगनमत करून गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणा मध्ये राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी भाजपकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप कविता यांनी केला आहे.
Bihar Politics : राजकीय अफवांवर तेजस्वी यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले “ना नितीशकुमार यांना; ना मला….”
त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप या आधीच फेटाळले असून आपण काहीहीं चुकीचे केलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. आपण कविता यांच्या बेनामी मालमत्तेचे व्यवहार करीत होतो अशी कबुली पिल्लई याने ईडीकडे दिली आहे असे ईडीचे म्हणणे आहे.