मुंबई – अभिनेत्री करीना कपूर खान सध्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मुळे चर्चेत आहे. करीनाच्या शोमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी येतात आणि करीन त्यांना मजेदार प्रश्न विचारत असते. आता या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा करीना कपूरसोबत बोलतांना दिसत आहे. कपिल शर्मा या शोमध्ये त्याच्या ज्विगाटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. गेल्या आठवड्यातच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये करीना कपूरचे प्रश्न जितके मजेदार आहेत, तितकीच कपिल शर्माची उत्तरेही मजेदार आहेत.
जेव्हा करीना कपूरने कपिल शर्माला त्याच्या रात्री उशिरा झालेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल विचारले तेव्हा कॉमेडियन म्हणाला, “मी ट्विटर बर्डला कधीच भेटलो नाही, पण त्याने माझा पोपट केला.” करीना कपूरने कपिल शर्माला विचारले की, आम्ही कपिल शर्माची मजेदार बाजू पाहिली आहे, तूही तितकाच रोमँटिक आहेस का? यावर कपिल शर्माने मजेशीर उत्तर दिले आहे. मला दोन मुलं आहे आम्ही हे डाऊनलोड केले नाही?’ अशाप्रकारे कपिल शर्माने करीना कपूरला हे उत्तर दिले.
कपिल शर्माचा झ्विगातो चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. या चित्रपटात कपिल शर्मासोबत शहाना गोस्वामी दिसली होती. कपिल शर्माच्या झ्विगाटोचे बजेट जवळपास 10 कोटी रुपये आहे. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे अडीच कोटींचा व्यवसाय केला आहे.