नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आज 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. पुतिन यांनी आपल्या अभिनंदन संदेशात भारताचे जोरदार कौतुक केले आहे. ते म्हणाले की, सामाजिक, कर्तव्याच्या मार्गावर भारताने आपली ताकद दाखवली आहे. तसेच वैज्ञानिक, आर्थिक, तांत्रिक आणि इतर क्षेत्रातील भारताची कामगिरी देखील सर्वानाच ठाऊक आहे. आंतरराष्ट्रीय स्थिरतेत भारताची भूमिका मोठी आहे.
पुतीन पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक अजेंड्यावरील महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यात भारताचे मोठे योगदान राहिले आहे. त्यासोबतच भारत देशाने जागतिक शांततेतमोठी भूमिका बजावली आहे.
यासोबतच पुतीन यांनी आपल्या संदेशात रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, त्यांना विश्वास आहे की, एकत्र काम करून दोन्ही देश सर्व क्षेत्रात परस्पर फायदेशीर द्विपक्षीय सहकार्याची निरंतर वाढ सुनिश्चित करतील.
आज 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर परेड काढण्यात आली. त्याचवेळी 50 लढाऊ विमानांनी जगाला आपले कर्तृत्व दाखवले. दरम्यान, विविध राज्यांच्या आकर्षक चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्ररथाच्या प्रदर्शनातून विविध धार्मिक, समाजिक घटकांचे दर्शन घडवण्यात आले.