नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ( Delhi Mayor election ) एकूण तीन अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील दोन अर्ज आम आदमी पक्षाचे असून एक अर्ज भाजपचा आहे.
आम आदमी पक्षाने दक्षतेचा उपाय म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत. एखाद्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणाने बाद करण्यात आला तर पर्याय म्हणून दुसरा अर्जही दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी तसेच स्थायी समितीच्या चार जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर होती. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी तीन आणि स्थायी समिती सदस्यांसाठी सात नामांकन प्राप्त झाले आहेत.
महापौरपदासाठी शेली ओबेरॉय आणि आशु ठाकूर (आप), रेखा गुप्ता (भाजप) यांचे अर्ज दाखल झाले आहेत. उपमहापौरपदासाठी आलेले मोहम्मद इक्बाल आणि जलज कुमार (आप), कमल बागरी (भाजप) हे उमेदवार आहेत.