मुंबई – अभिनेता सलमान खान आपल्या चित्रपटांपेक्षा खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत अनेकदा सलमानचे नाव चर्चेत राहिले आहे. आता देखील एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला सलमान खान डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीने यापूर्वी अल्लू अर्जुन,प्रभास,रामचरण अशा दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर केलेली आहे आणि लवकरच ती सलमानसोबत देखील दिसणार आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेला आज कोण ओळखत नाही. पूजा लवकरच ‘किसी का भाई किसी कि जान’ या आगामी सलमानच्या चित्रपटात झळकणार आहे. यावरूनच आता दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच उमर संधू नावाने असलेल्या ट्विटरवरून सलमान आणि पूजाचा फोटो टाकत एक पोस्ट करण्यात आली आहे. “ब्रेकिंग न्यूज, सलमान पूजा हेगडेच्या प्रेमात. पूजाला सलमानच्या प्रोडक्शन हाऊसकडून दोन चित्रपटांची ऑफर मिळाली आहे. ते एकमेकांना डेट करत आहेत जवळच्या व्यक्तीकडून ही माहिती मिळाली आहे” असं या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
BREAKING NEWS : New Couple in Town !!! Mega Star #SalmanKhan fell in love with #PoojaHegde !! His production house also signed her for next 2 films !! They are spending time together now a days !! Confirmed by Salman Khan close sources. pic.twitter.com/2lkNIXH3IE
— Umair Sandhu (@UmairSandu) December 7, 2022
अभिनेत्री पूजा हेगडे सलमान पेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा सलमानच्या नव्या अफेअर्सच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु झाल्या आहेत. यासोबतच सोशल मीडियावर देखील या विषयावर चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक हिंदी इंग्रजी मीडिया हाऊसने देखील याबाबत बातम्या पब्लिश केल्याने चर्च्यांना उधाण आले आहे.