मुंबई – दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा एका अभिनेत्रीला मुलखात देताहेत आणि यादरम्यान अभिनेत्रीच्या पायाला देखील किस करताहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असताना ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण ? असा प्रश्न सर्वांना पडलाय.
आशु रेड्डी असं या अभिनेत्रीच नाव आहे. आशु रेड्डी एक तेलुगु चित्रपट अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएनसर आहे. रेड्डी बऱ्याचदा विदेशात स्थायिक असते. इंस्टाग्रामवर तिचे 1.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि YouTube वर 2.4 लाखांहून जास्त सबस्क्रायबर आहेत. तिने 2018 मध्ये ‘चल मोहन रंगा’ या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते.
https://youtu.be/80AX_YFgTFI
आशु 2019 मध्ये बिग बॉस तेलुगु सीझन 3 मध्ये सहभागी झाली होती. शो दरम्यान आशुने सांगितले की, तिने एकाच वेळी दोन मुलांना अनेकदा डेट केले आहे. आशू म्हणाली होती की, जर समोर दोन हॅंडसम पुरुष असतील तर दोघांना डेट करण्यात गैर काय? नागार्जुन या शोचा होस्ट होता.आशु रेड्डी आरजीव्हीच्या आगामी डेंजरसमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा भारतातील पहिला लेस्बियन ऍक्शन चित्रपट आहे. ज्यामध्ये नैना गांगुली आणि अप्सरा राणी देखील दिसणार आहेत.