Virat Kohli – टी-२० विश्वचषकचा दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी होणार आहे. हा सामना ऍडिलेडमधील ओव्हल मैदानावर दुपारी १.३० वाजता खेळला जाईल. बुधवारी झालेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान संघ न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे आता उद्याच्या सामान्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात आमने-सामने पाहायला मिळणार, अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
#PAKvsNZ | पाकिस्तान फायनलमध्ये! न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव
दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने या सामन्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली ( Virat Kohli ) मागील काही दिवस खराब फॉर्ममध्ये होता, तेव्हा त्याला मी पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात कोहलीने धावा करू नयेत, अशी धक्कादायक इच्छा पीटरसनने व्यक्त केली आहे.
विराट कोहली ( Virat Kohli ) यंदाच्या या स्पर्धेत त्याच्या जुन्या रूपात पाहायला मिळाला. त्याने आत्तापर्यंत ५ सामन्यात २४६ धावा करत दमदार फलंदाजी केली आहे. याशिवाय विराट कोहली टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. टी-२० विश्वचषकातील २५ सामन्यांमध्ये त्याने सर्वाधिक १०६५ धावा केल्या आहेत.
केविन पीटरसनने विराटबाबत ( Virat Kohli ) एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने म्हटले की,”मी विराट कोहलीला त्याच्या वाईट काळात संपूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याला मैदानात प्रेक्षकांची गर्दी असल्यास खेळण्यासाठी ऊर्जा मिळते. त्याला मैदानात चाहत्यांकडून मिळणार पाठिंबा हवा असतो. मागील काही काळात त्याच्याकडे या सर्व गोष्टी नव्हत्या. मात्र, ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकादरम्यान त्याला हवी असलेली गर्दी आणि चाहत्यांचा पाठिंबा मिळाला. एक जवळचा मित्र असल्याने मी विराटसाठी खूप आनंदी आहे, पण त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धावा करू नये.”