मुंबई – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारवर शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी खोके (पैसे) घेतल्याची विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर खोके घेतल्यावरून टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे भिकार** म्हटल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. सत्तार यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले,’अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस आहे. अब्दुल सत्तार यांची माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी, अशा शब्दात खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’देवेंद्र फडणवीस हे सर्व कसे काय सहन करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही.’