बारामती -बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि ऍमेझॉनमध्ये तांत्रिक सहयोग आणि शेतकरी मार्गदर्शनांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. कृषी विज्ञान केंद्रातील शास्रज्ञ हे ऍमेझॉनच्या भारतातील सर्व संकलन केंद्रावर प्रत्यक्ष तसेच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी ऍमेझॉन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार आहेत. विषमुक्त पीक उत्पादन व काढणी पश्चात तंत्रज्ञानाची रूपरेषा बनवून शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाईल.
यातून शेतकऱ्यांचा तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे कमी खर्चात जादा उत्पादन व नफा मिळवण्याचा प्रयत्न आहे. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे म्हणाले की, ऍमेझॉनचे तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान केंद्राचा शेती क्षेत्रातील अनुभव व कार्य देशातील शेतकऱ्यांना सामंजस्य कराराने शेतीविषयक ज्ञानाचे नवीन दालन उघडेल. महाराष्ट्रातील प्रगत शेतीची गाथा सर्व देशात पोहोचेल.
हवामान बदलाने शेती अजून बिकट होत जाईल. त्यासाठी शेतकरी तयार राहावेत, यासाठी दोन्ही संस्था प्रयत्नशील आहेत. महिला बचत गट व शेतकरी उत्पादन कंपन्यांना तांत्रिक मार्गदर्शन करून त्यांची उत्पादने ऍमेझॉनमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.