लाहोर : पाकिस्तानमध्ये सध्या पुरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानी मीडिया किंवा पत्रकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. याआधीही रिपोर्टींगचे अनेक मजेदार व्हिडीओ समोर आले आहेत. तर वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रातील भांडणाचे व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी पत्रकाराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. थेट महापुरातून या पत्रकारानं महाकव्हरेज केले आहे.
पाकिस्तानमधील पुरात आतापर्यंत हजारहून अधिक नागरिकांसह शेकडो जनावरांच्या मृत्यू झाला आहे. पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय आणीबाणीही लागू केली आहे. दरम्यान आता पुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पत्रकार पुराच्या पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून पूरस्थितीचे वार्तांकन करताना दिसत आहे. रिपोर्टरच्या वार्तांकनाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे.
पाकिस्तानमधील महापुराचे रिपोर्टींग करतानाचा एका रिपोर्टरचा व्हिडीओ सध्या जगभरात जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये रिपोर्टर पुराच्या पाण्यामध्ये उतरून जीव धोक्यात घालून वार्तांकन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, हा पत्रकार मानेपर्यंत खोल असलेल्या पाण्यात उतरून कसातरी माईक सांभाळत रिपोर्टींग करत आहे. पण विशेष म्हणजे एवढ्या खोल पाण्यात जीव धोक्यात घालूनही या पत्रकाराने हातातील माईक मात्र सोडला नाही.
Dangerous,deadly,killer #Pakistani #Reporting..
There is #FloodinPakistan and news channels,army and #ImranKhan too
All 4 become uncontrollable,can do anything..#PakistanFloods #PakArmy #flood pic.twitter.com/aI5KeRsiwL
— Anurag Amitabhانوراگ امیتابھअनुराग अमिताभ (@anuragamitabh) August 27, 2022
पाकिस्तानी पत्रकाराचा मानेपर्यंत उंच पाण्यातील लाईव्ह रिपोर्टींगचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. खोल पाण्यात माईक सांभाळत पत्रकारानं केलेली लाईव्ह रिपोर्टींग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हायरल व्हिडीओ अनुराग अमिताभ नावाच्या युजरने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.