मुंबई : भाजपचे नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख करून बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल असे ट्विट केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे.
सर्वकाही सत्तेसाठी
याबाबत त्या बोलताना म्हणाल्या , नारायण राणे यांना कुणी गंभीरपणे घेत नाही. बंडखोरांना मदत करायला आलेले नारायण राणे हे तुम्ही रचलेले कुरवान आहे. तुमच्यावर ईडीची कारवाई होऊ नयेत म्हणून तुम्ही भाजप पक्षा मध्ये गेलात. आणि आता धुतल्या तांदळासारखे वागता. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष रित्या त्यांनी टीका केली. सध्या राज्यात जे काही चालू आहे ते सर्व सत्तेसाठी साठी चालू असून या सत्तापिपासू लोकांनी कोणतीही विकासकामे न करता केवळ सत्तेसाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे जे काही झटके येत होते. त्यासाठीच हे सर्व काही रचून आणले जात आहे असे त्या म्हणाल्या.
नारायण राणे बेडकासारखे आले कुठून ?
हे जे कोण आमदार आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत. शिवसेनेचे आहेत त्यांच्याशी कसे आणि काय बोलायचे हे आम्ही ठरवू. नारायण राणे बेडकासारखे आले कुठून ? असा सवाल त्यांनी केला. शिवाय त्यांचा संबंध काय माननीय शरद पवारांना सांगायचा ? असा सवाल त्यांनी केला. परिस्तिथी कितीही गंभीर असली तरी शरद पवार आणि महावीकास आघाडी खंबीर आहे असे त्यांनी म्हंटले. शिवाय नारायण राणे यांनी ह्या ज्या काही धमक्या दिल्या आहेत त्या तुमच्या वैयक्तिक आहेत की पक्षाच्या आहेत हे सांगावं… मग आम्ही ठरवतो काय करायचं ते असे त्या म्हणाल्या.
काय आहे नारायण राणे यांचे ट्विट
“माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. बंडखोर त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल” असे ट्विट नारायण राणे यांनी केले होते.