मुंबई – “स्वतःची निवडून येण्याची धमक नाही. आपल्या पक्षातील महिला आमदारांना घरी बसवून जे स्वतः आयत्या बिळावर नागोबा बनतात. त्यांनी संसदरत्न मिळालेल्या व्यक्तीला घरी बसून स्वयंपाक करा, असा सल्ला देणे अत्यंत हास्यास्पद आहे.” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही मानत असलेली मनुस्मृती तुमच्यापुरती सीमीत ठेवा. आम्हा सावित्रींच्या लेकींना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. जर सल्ला दिला तर मग आम्ही गप्प बसणार नाही. मला असं वाटतं की तुम्ही जरा चपात्या बनवायला शिकून घ्या. म्हणजे 2024 नंतर तुमच्या बायकोला घरात तरी तुमची मदत होईल.”