मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही केतकीच्या पोस्टबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’सोशल मीडियातून शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना खरंतर लाजा वाटल्या पाहिजेत. अशा लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, माध्यमांशीही बोलतांना ते पुढे म्हणाले,’अभिनेत्री असो अथवा कुणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यामागे मनुवाद तर नाही ना? हे तपासलं पाहिजे’ असं म्हणत भुजबळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली. या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आता केतकीवर टीकेची झोड उठली आहे.