जळोची – रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्य शासन, खासदार सुप्रिया सुळे, पुणे आणि सोलापूर विभाग, दौंड-पुणे- दौंड प्रवासी संघाच्या पाठपुराव्याने दौंड- बारामती- पुणे मेमू सेवा दोन वर्षांनंतर रुळावर आली आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संसर्गात ही सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर पहिल्या लॉकडाऊननंतरही डेमू सुरू झाली नव्हती. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होती. तरीही सेवा सुरू झाली नाही. त्यानंतर पाच महिन्यांतच दुसरी लाट येऊन आली. त्याची भर पडल्याने पुन्हा सेवेस ब्रेक मिळाला.
दुसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाची मोहिम राबविली होती. त्यावेळी रेल्वे कर्मचारी, दोन लस घेतलेले प्रवासी यांना सवलत दिली होती. त्यावेळी दररोज पुण्यात येणारे प्रवासी खासगी गाड्यांचा आधार घेत येत होते. यात हजारो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत होता. तरीही रेल्वे प्रशासन ढिम्म होते. खासदार सुप्रिया सुळे, यासाठी प्रयत्नशील होता.
अखेर रेल्वे प्रशासनाने (दि.3) डेमू, मेमूसाठी हिरवा कंदील दाखवत 11 एप्रिलपासून पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहाटे ते रात्रीपर्यंतच्या वेळेत सर्व लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांना मोठा फायदा होणार आहे. 11 एप्रिलपासून पूर्ववत ही रेल्वे सेवा पूर्ववत होणार आहे.
पहाटे साडेचारपासून ते रात्री सव्वा दहापर्यंत या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे पुणे-दौंड-बारामती मार्गावर डेमू आणि मेमूच्या गाड्या प्रवाशांच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत.