तळेगाव ढमढेरे – येथील महावितरण प्रशासनाने तळेगाव ढमढेरे, दरेकरवाडी परिसरात कारवाईची मोहीम सुरू करुन वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना नवीन वर्षात दणका दिला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.
करोना काळात थकलेल्या वीजबिलामुळे त्रस्त झाला असल्याचे दिसून येत आहे. तर काही ग्राहकांनी वीजपुरवठा बंद करून आकडा टाकून वीजचोरी करण्यासारखा फंडा अवलंबल्याचे
महावितरण प्रशासनाच्या लक्षात आले. त्यावेळी जवळपास एक टेम्पो भरून वायर, 25 बॉक्स तसेच स्टार्टर जप्त करण्यात आले.