नवी दिल्ली : तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. कोईम्बतूर आणि सुलूर यादरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. रावत हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असल्याच्या बातमीला आता भारतीय हवाई दलाने दुजोरा दिला आहे.
Military chopper crashes in Tamil Nadu. Senior officials were on board. More details awaited. pic.twitter.com/j3jXy66q6k
— ANI (@ANI) December 8, 2021
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासहित त्यांचे कुटुंबीय या Mi सीरिज हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.
हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेले ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.
दुर्घटनेचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.