हैदराबाद – सोशलवर सध्या एका व्हिडियोमुळे युजर्स चांगलेच संतापले आहे. या व्हिडियोमध्ये पोलीस अधिकाऱ्यानं आठ वर्षाच्या मुलीसमोर तिच्या वडिलांच्या कानशिलात लागवल्यामुळे सोशलवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांच्या अरेरावीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
POLICE STATE?#Mahabubnagar police conducting a drive to ensure people are wearing masks/helmets &following rules. They stopped this man who was apparently going for vegetables& slapped him. The man says you can fine me but who gives a right to slap me in front of my child? pic.twitter.com/UpnQPEjk5M
— Revathi (@revathitweets) December 6, 2021
व्हायरल व्हिडियो हा तेलंगणातील महेबूबनगर परिसरातील आहे.या व्हिडियोमध्ये तेथील स्थानिक पोलीस अधिकारी बाजारात जात असलेल्या श्रीनिवास नावाचा व्यक्तीला हेल्मेट न घातल्याने अडवतो. यावेळी त्याच्या सोबत त्यांची आठ वर्षांच्या लेकही असते. हेल्मेट न घातल्यावरून पोलीस आणि श्रीनिवास यांच्यात वाद वाढतो.
हा वाद इतका वाढतो की श्रीनिवासच्या मुलीच्या समोर पोलीस अधिकाऱ्यानं त्याला कानाखाली मारतांना व्हिडियो दिसत आहे. आठ वर्षाच्या मुलीसमोर कानशिलात लागवली आहे. तेलगू भाषेतील या व्हिडीओमध्ये मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही सांगून जात आहेत.
परिणामी सध्या सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडियो तेलगू भाषेत असला तरी व्हायरल झालेल्या व्हिडिओची देशभरात प्रचंड चर्चा होत आहे. या घटनेचा सोशलवरून निषेध दर्शविला जात आहे.