नवी दिल्ली : तामिळनाडूत भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे Mi- 17V5 हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हवाई दलाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेलिकॉप्टरमध्ये हे अधिकारी करत होते प्रवास?
सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिखा रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.