बंगळुरू – अवघ्या जगाला पुन्हा एकदा चिंतेच्या खाईत लोटणाऱ्या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणू प्रकाराने अखेर भारतात एन्ट्री केली आहे. कर्नाटकात विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने बाधित दोन रुग्ण आढळून आले आहेत. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने ‘ऍट रिस्क’ देशांच्या यादीत टाकलेल्या देशांतून आलेल्या १० प्रवाशांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. यातील दोन बाधितांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचं जीनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून समोर आलं आहे.
ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन्ही रुग्ण पुरुष असून त्यांचे वय ६६ वर्षे व ४६ वर्षे आहे. प्राप्त माहितीनुसार बाधा झालेल्यांपैकी एका रुग्णाने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आतापर्यंयत ३७ फ्लाईट्सने ७९७६ आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात दाखल झाले आहेत.
दरम्यान, या दोन्ही रुग्णावर सध्या बंगळुरू येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रशासनाने या दोन प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु केले आहे.