वाघोली (प्रतिनिधी) | कोलवडी साष्टे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भागवत खूपसे यांची निवड झाली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूर्व हवेलीतील उद्योजक रमेश मदने यांच्या हस्ते उपसरपंच पदी नियुक्ती झाल्याबद्दल खूपसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच सुरेखा गायकवाड, माजी सरपंच तुकाराम पवार, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अर्जुन मदने, माजी सरपंच सतीश गायकवाड, माझी चेअरमन बाजीराव भालसिंग, माजी उपसरपंच आनंदा पवार, माजी सरपंच बबन गायकवाड, माजी उपसरपंच विशाल मदने, दिलीप उंद्रे उद्योजक मयूर मदने, अभिजीत मदने, सौरभ मदने, निलेश रिकामे आदी मान्यवर उपस्थित होते.