मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिड महिन्यांपासून राज्यातील मंदिरे व प्रार्थना स्थळे बंद आहेत. भाजपकडून हे मंदिरे चालू करण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? असा सवाल कॉंग्रसे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला केला आहे.
शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 30, 2021
सचिन सावंत म्हणाले की, शंखासूर भाजपा आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे. भाविकांच्या जीवाचीही पर्वा नाही.
भाजपा सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली? केंद्र सरकारने उत्सवावर निर्बंध घालावेत हे निर्देश दिले आहेत. मोदींविरुद्ध भाजपा नेते आंदोलन करणार का? दुसरी लाट वाढवण्याचे काम भाजपाने केले आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न आहे.
रुग्ण वाढले तर मोदी टिका करतात दुसरीकडे भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात. जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. पोलीसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये.