वॉशिंग्टन : काबूल एअरपोर्टच्या दिशेने सोडण्यात आलेली पाच विध्वंसक रॉकेट अमेरिकेने निकामी केली. हल्ल्याच्या दृष्टीने ही पाच रॉकेट काबूल विमानतळाच्या दिशेने सोडण्यात आली होती. मात्र अमेरिकेच्या डिफेन्स मिसाईल सिस्टिमने आधीच धोका ओळखून, या रॉकेटचा हल्ला होण्यापूर्वीच ती निकामी केली. अमेरिकेने हा हल्ला परतवल्याने मोठा अनर्थ टळला. इंटरसेप्ट अर्थात आपल्या दिशेने येणारे रॉकेट किंवा मिसाईलचा शोध घेऊन, त्यावर कारवाई करणं.
अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही हे रॉकेट निकामी केली आहेत. पण ती सर्वच्या सर्व निकामी झाली आहेत की नाही याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. सोमवारी सकाळी हे हल्ले झाले होते.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांच्या मते, या हल्ल्याची माहिती राष्ट्रपती जो बायडन यांनाही देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेने रविवारी काबूलमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले. यामध्ये एका आत्मघाती हल्लेखोरालाही टार्गेट करण्यात आलं. हा हल्लेखोर काबूल विमानतळावर हल्ला करण्याच्या तयारीत होता, असं सांगण्यात येत आहे.
अमेरिकेच्या मते, काबूल एअरपोर्टवर आयसिसचे दहशतवादी पुन्हा हल्ला करु शकतात. अमेरिकन सैन्य त्यांच्या रडारवर आहे. हे सैन्य सध्या काबूलमध्येच आहे. अमेरिका आपल्या सैन्याला 31 ऑगस्टपूर्वी तिथून हटवण्याच्या तयारीत आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एका मोठ्या स्फोटानं हादरलीय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS नं आठवड्याभरात सलग दुसरा हल्ला केलाय. एक रॉकेट काबूल एअरपोर्टच्या दिशेनं सोडण्यात आलं.
अर्थात टार्गेटवर अमेरीकन सैनिक आणि जिथून अमेरीकन विमानं उड्डान भरतायत तो भाग होता. पण हे हल्ला करण्यात आलेलं रॉकेट लक्ष्य भेदू शकलं नाही. आणि ते रॉकेट जवळच्याच निवासी भागात कोसळलं.