मुंबई- मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णय घेत मुंबईतील लोकल सेवा बंद केली. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईची लोकल सेवा बंद होती.
काल (दि. 8) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल प्रवास सेवा करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना 15 ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा केली. मुंबईतील लोकल सेवा लवकरात लवकर सुरु करावी यासाठी अनेक राजकीय नेत्यांनीआपली भूमिका मांडली होती.
Ye laga sixer!!
Big victory for @BJP4Mumbai!!
Local train start from 15th August!!झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये!!! @Dev_Fadnavis @mipravindarekar @PrasadLadInd @ShelarAshish @MPLodha
— nitesh rane (@NiteshNRane) August 8, 2021
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांचे एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. “झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये!!! असा टोला राणे यांनी लगावला आहे. ‘ये लगा सिक्सर… मुंबई भाजपच्या आंदोलनाला यश.. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलसेवा सुरु होतीय..झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये’ या आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.