नवी दिल्ली – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस- शाह यांच्या या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. राज्यातील गेल्या दोन दिवसांपासून अनेक प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे.
एकीकडे फडणवीस शाहांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते.