परिस्थिती हाताबाहेर! अमेरिकेतील ‘या’ शहरात डेल्टाचा कहर; सहा आयसीयू, 300 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध

न्यूयॉर्क : अमेरिकत करोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दोन वर्षानंतरही  अमेरिकेसारखा मोठा देशही करोनापुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता अमेरिकेत  डेल्टा व्हेरिएंटचा कहर असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून फक्त सहा आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत.

ऑस्टिनची लोकसंख्या जवळजवळ 24 लाख असून फक्त सहा आयसीयू आणि 300 व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहे. सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय संचालक डेस्मर वॉक्स यांनी एका निवेदनात “परिस्थिती गंभीर असून याबाबत येथील रहिवाशांना आम्ही मेसेज, ईमेल आणि फोन करून सूचना पाठवत आहोत. सध्या आमच्या रुग्णालयांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून आम्ही त्यासाठी काहीच करू शकत नाही” असे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सात दिवसांची सरासरी 600% पेक्षा जास्त वाढल्यानंतर धोका वाढला. तर अतिदक्षता विभागातील रुग्णांमध्य तब्बल 570% वाढ नोंदवली गेली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 4 जुलै रोजी 8 इतकी होती ती आता 102 झाली आहे.

हॉस्पिटलच्या बेडची उपलब्धता आणि क्रिटिकल केअर सेंटरची संख्या अत्यंत मर्यादित आहे.  पुन्हा एकदा अमेरिकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत.

रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ झाली असून हॉस्पिटलमध्ये आता जागाच शिल्लक नसल्याचे चित्र आहे. फ्लोरिडा, लुइसियाना आणि मिसीसिप्पीमधील हॉस्पिटल्स हे रुग्णांनी भरून गेले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.